चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल घसरल्यामुळे नव्या वर्षामध्ये आतापर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारीही दरांमध्ये घसरण होणे सुरूच राहिले. सोमवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १३ पैशांनी तर डिझेलचे प्रतिलिटर १६ पैशांनी घसरले.
विदर्भातील ६० टक्के शेतकऱ्यांना मानसिक आजार, सर्वेक्षणाचे निष्कर्ष
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर सोमवारी प्रतिलिटर ७७.७६ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६८.१९ रुपये इतका आहे. १२ जानेवारीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. फेब्रुवारीमध्येच या दोन्ही इंधनांच्या दरात आतापर्यंत प्रतिलिटर एक रुपयाने घसरण झाली आहे.
आम्हाला हिंदुत्व सिध्द करायची गरज नाही: उद्धव ठाकरे
पेट्रोलियम पदार्थही वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणले जावेत, अशी मागणी होते आहे. पण या संदर्भातील निर्णय वस्तू व सेवा कर परिषदच घेऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, हा निर्णय कधी घ्यायचा हे सर्वस्वी सर्व राज्यांवर अवलंबून आहे. सर्व राज्ये आणि वस्तू व सेवा कर परिषद याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकेल.