पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दर महिना ५५ रुपये जमा केल्यास मिळेल ३६००० रुपयांची पेन्शन

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान श्रम-योगी मानधन (पीएमएसवायएम) पेन्शन योजना सुरु झालेली आहे. या योजनेपूर्वी नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) नागरिकांसाठी उपलब्ध होती. अटल पेन्शन आणि श्रम-योगी मानधन योजनेत निश्चित पेन्शनची तरतूद आहे. श्रम-योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रासाठी आहे. जाणून घेऊयात या पेन्शन योजनेबाबत..

प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना असंघटित क्षेत्राशी निगडीत कोणताही कामगार ज्याचे वय ४० वर्षांहून कमी आणि कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेत नसेल, त्याला यो योजनेत सहभागी होता येईल. असंघटित क्षेत्राशी निगडीत कामगार, घरात काम करणारा नोकर, चालक, रिक्षा चालक, बांधकामावरील मजूर, कचरा वेचक, विडी कामगार याचा फायदा घेऊ शकतात.

दर महिना मिळतील ३ हजार रुपये

सरकार ही योजना घेणाऱ्यांना ३ हजार रुपये मासिक पेन्शन देईल. सरकार आणि पेन्शन घेणारे एक समान रक्कम पेन्शनसाठी देतील. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे बचत खाते आणि आधार कार्ड आवश्यक आहे. व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांहून अधिक नसावे. 

जमा करावे लागतील ५५ रुपये

जर कोणी १८ व्या वर्षी ही योजना सुरु केली तर त्याला ५५ रुपये जमा करावी लागेल. जर ४० व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने या योजनेत सहभाग घेतला तर त्याला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला पेन्शन सुरु होईल.