पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या दोन वर्षांत पेटीएमकडून समभाग विक्रीसाठी तयारी, विजय शेखर यांची माहिती

विजय शेखर शर्मा

येत्या २२ ते २४ महिन्यांमध्ये पेटीएम प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) तयारी सुरू करणार असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी दिली. सिंगापूरमध्ये एचटी-मिंट एशिया लीडरशीप समिटमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

छत्रपतींच्या किल्ल्यांना हात लावणार नाही: पर्यटन विभागाचा खुलासा

गेल्या वर्षी वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेकडून पेटीएमने ३० कोटी डॉलरचा निधी उभारला होता. यानंतर कंपनीच्या बाजारमूल्यात १५ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याची माहिती विजय शेखर शर्मा यांनी मिंटला दिली होती.

पेटीएमची सहकंपनी वन९७ कम्युनिकेशन्स ही भारतातील डिजिटल क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीचे बाजारमूल्य १ अब्ज डॉलरपर्यंत आहे. या कंपनीमध्ये अलिबाबा समूह आणि सॉफ्टबॅंक व्हिजन फंड यांची गुंतवणूक आहे.

चांद्रयान-२: भारत इतिहास रचेल, मी खूप उत्साहित- पंतप्रधान मोदी

पुढील काळात वाढीसाठी सार्वजनिक क्षेत्रातून निधीची उभारणी करणे आवश्यक आणि टाळता न येण्यासारखे काम आहे. पण ही समभाग विक्री नेमकी कशा पद्धतीने करायची याचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यापूर्वी कंपनीने अधिकाधिक निधी उभारावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Paytm to start planning IPO in 22 24 months says CEO Vijay Shekhar at HT Mint Asia Leadership Summit