पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पारले जी कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

पारले जी कंपनीच्या उत्पादनात घटम

देशातील पारले जी बिस्कीट उत्पादन करणाऱ्या कंपनीतील हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याचे चिन्हे दिसत आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागू शकते. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, पारले जी बिस्कीटची ग्रामीण भागातील मागणीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

आशियातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या गर्तेत आहे. कपड्यांपासून ते वाहनांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून या क्षेत्रातील उत्पादन पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. भारत सरकार मंदीची समस्या दूर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण पाउल उचलेल, असा कंपन्यांना विश्वास आहे.  

 

'आर्थिक मंदीची चिंता दूर करण्यासाठी नव्या सुधारणांची गरज'

पारले कंपनीच्या अधिकारी मयंक शहा यांनी दूरध्वनीवरील मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पारले कंपनीच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होईल. कंपनीला उत्पादनामध्ये घट करावी लागेल. परिणामी ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांवर बरोजगार होण्याची वेळ येऊ शकते. सरकारने लवकरात लवकर यावर उपाय केला नाही, तर हजारो कर्मचारी बरोजगार होतील, असा उल्लेखही त्यांनी केला. भारतामध्ये १९२९ मध्ये पारले जी कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात जवळपास १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.