पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामगार कपातीची चर्चा फोल?, पारले बिस्किटचा नफा १५ टक्क्यांनी वाढला

पारले जी कंपनीच्या उत्पादनात घटम

बिस्किट तयार करणारी देशातील सर्वांत मोठ्या पारले कंपनीच्या उत्पादनांमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वी मंदी सदृष्य स्थितीमुळे १० हजार नोकऱ्या धोक्यात आल्याचे वृत्त आले होते. आता त्यांना १५.२ टक्के फायदा झाल्याचे वृत्त आले आहे. सोशल मीडियावर पारले जीच्या नफ्याचे वृत्त ट्रेंड होत असून ते वेगाने शेअर केले जात आहे. काही दिवसांपूर्वी लोकांकडे ५ रुपयांचे पारले जीचे बिस्किट खाण्यासाठी पैसे नव्हते, आता ती कंपनी नफा कमवत आहे, असे लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत. 

पारले जी कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

पारले कंपनीच्या पारले बिस्किट विभागाचा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये निव्वळ नफ १५.२ टक्क्यांनी वाढला आहे. पारले बिस्किट्सला नफा होण्याचे वृत्त खूप महत्वाचे आहे. कारण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बिस्किट उत्पादकांनी जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी केली होती. 

बिझनेस फ्लॅटफॉर्म टॉफ्लरच्या मते, आर्थिक वर्षांत पारले बिस्किट्सचा निव्वळ नफा  ४१० कोटी रुपये राहिला. जो मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ३५५ कोटी रुपये होता. यादरम्यान कंपनीच्या उत्पन्नात २०१७-१८ मध्ये हा आकडा ८,७८० कोटी रुपये होता. याबाबत बिझनेस स्टँडर्डने वृत्त प्रकाशित केले आहे.

Maruti Suzuki ने ४०,००० 'वॅगन आर' परत मागवल्या

पारले कंपनीच्या नफ्यावर भाष्य करताना भाजपचे अमित मालवीय यांनी टि्वटवर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी 'बुद्धिवादी अर्थशास्त्रज्ञ' लोक ५ रुपयांचे पारलेचे बिस्किटही खरेदी करु शकत नसल्याचे सांगत होते. पण कंपनीचा नफा हा १५.२ टक्क्यांनी वाढला आहे, आणि उत्पन्नही ६.४ टक्क्यांनी वाढून ०९,०३० कोटी रुपये झाला आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.