पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर तुमचे पॅनकार्ड बाद ठरणार

पॅनकार्ड आणि आधार कार्ड

तुमचे पॅनकार्ड ३१ मार्च २०२० पूर्वी तुमच्या आधार कार्डशी जोडले नाही तर ते बाद ठरेल, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची मुदत आत्तापर्यंत अनेकवेळा वाढविण्यात आली आहे. यावेळी ती मुदत पुढील महिन्यात ३१ तारखेला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन नव्या इमारती

प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ जानेवारीपर्यंत ३०.७५ कोटी पॅनकार्ड संबंधित आधार कार्डशी यशस्वीपणे जोडण्यात आले आहेत. पण अद्याप १७.५८ पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्यात आलेले नाहीत. 

या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एक जुलै २०१७ ज्यांना पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे. त्यांनी आपले पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक आहे. जर ३१ मार्च २०२० पूर्वी संबंधित पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्यात आले नाही तर ते बाद ठरेल. 

राज्य सरकारच्या आदेशानंतर अरविंद सावंत पुन्हा दिल्लीला जाणार

ज्या नागरिकांचे पॅनकार्ड बाद ठरेल ते प्राप्तिकर कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पुढील कारवाईसाठी पात्र ठरतील. त्यांना आपला पॅनकार्ड वापरता येणार नाही, असेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PAN to become inoperative after 31 March if not linked with Aadhaar Income Tax department