पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पॅन-आधारशी लिंक करण्यासाठी आणखी मुदत वाढ

पॅनकार्ड आणि आधार कार्ड

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ हा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती. ज्या  पॅन कार्डधारकांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांना दिलासा देणारे वृत्त आहे. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली आहे. मार्च २०२० पर्यंत पॅन-आधारशी लिंक करता येणार आहे.  

नव्या वर्षातील दहा नवे नियम अन् त्याचे परिणाम

प्राप्तीकर कायदा १९६१ च्या तरतूद 139AA नुसार, तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे. यासाठी प्राप्तीकर विभागाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे ही प्रक्रिया अद्यापही न करणाऱ्या अनेकांची चिंता वाढली होती. याची मुदत आता ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती करण्यात आल्याची माहिती CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस्) ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.   

Paytm च्या माध्यमातून २४ तास NEFT सेवा, अशी सेवा देणारे पहिले अ‍ॅप

आयकर अधिनियमन १९६१ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बदललेल्या नियमावलीनुसार, पॅन क्रमांकाच्या ऐवजी आधार क्रमांकाचा वापर करणे शक्य होणार आहे. मात्र चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दंड वसूल करण्याचा नियम करण्यात आला आहे.  पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करणाऱ्याला दंडात्मक कारवाईचा नियम लागू असेल. उल्लेखनिय आहे की, इनकम टॅक्स रिटर्न फायलिंग, बँक अकाउंट, डी मॅट अकाउंट आणि ५० हजारपेक्षा अधिक म्यूचुअल फंड तसेच बाँड खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य होते. मात्र नव्या नियमानुसार आता या व्यवहारामध्ये आधार कार्डचा वापर शक्य होईल. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून भारतातल्या नागरिकाला मिळते तर पॅन हा दहा अंकी क्रमांक आयकर विभाग देतं. हा क्रमांक एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीचा असू शकतो.