पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! पीएफवरील व्याजदरात वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

देशातील सहा कोटींपेक्षा जास्त नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर (पीएफ) ८.६५ टक्के इतके ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी दिली. आधीच्या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.५५ टक्के इतके व्याज मिळाले होते.

वाढदिवसानिमित्त मोदींनी केले नर्मदा नदीचे पूजन

नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संतोष गंगावर म्हणाले, सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफवर ८.६५ टक्के इतका व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी पीएफवर ८.५५ टक्के इतके व्याजदर निश्चित करण्यात आले होते. 

पीएफवर नक्की किती व्याज द्यायचे यावरून केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालय यांच्यामध्ये एकवाक्यता नव्हती. त्या पार्श्वभूमीवर संतोष गंगवार यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना ८.६५ टक्के इतके व्याज दिल्यानंतरही भविष्य निर्वाह निधी न्यासाकडे पुरेशी जास्तीची रक्कम शिल्लक राहात असल्याचे संतोष गंगवार यांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

पाकिस्तानमध्ये हिंदू विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर किती टक्क्याने व्याज द्यायचे याचा निर्णय केंद्रीय विश्वस्त न्यासाकडून घेतला जातो. फेब्रुवारीमध्ये न्यासाच्या बैठकीतच २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याजदर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने त्याला विरोध केला. व्याजदर ०.१० टक्क्याने कमी करावा, अशी सूचना अर्थ मंत्रालयाने केली होती. त्यामुळेच कामगार मंत्रालयाने नवे व्याजदर जाहीरच केले नव्हते.