पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन असलेल्या शहरांमध्ये ओला-उबरची सेवा तात्पुरती बंद

ओला कॅबचे संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने ७५ प्रभावित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला, उबरसारख्या कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या जिल्ह्यांमधील आपली सेवा तात्पुरत्यारित्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाची मायक्रो, मिनी, प्राइम, रेंटल आणि आऊटस्टेशन सेवा बंद केल्या आहेत. 

लॉकडाऊननंतर शरद पवार यांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

ओलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या निर्देशानुसार ओला नागरिकांना केवळ आवश्यक आपात्कालीन गरजांसाठी सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. आम्ही कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नाअंतर्गत या शहरांमध्ये आवश्यक सेवांची सुविधा जारी ठेवू. 

उबरने आपल्या प्रवाशांना एक ई-मेल पाठवला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सरकारी दिशानिर्देशांनुसार आम्ही आपल्या शहरातील सर्व उबर सेवा तात्पुरत्यारित्या निलंबित करत आहोत. याचाच अर्थ उबरच्या प्रवासी सेवा पुढील नोटिसीपर्यंत उपलब्ध होणार नाहीत. 

यापूर्वी ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राईडवर बंदी घातली होती. ओलाने आपल्या निवेदनात म्हटले की, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रयत्नांअंतर्गत कंपनी 'ओला शेअर' सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरती बंद करत असल्याचे म्हटले होते. 

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. देशात मागील दोन दिवसांत १३७ प्रकरणे समोर आल्यानंतर सोमवारीही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. ताज्या आकडेवारीनुसार, आता देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१५ पर्यंत गेली आहे.