पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओलाचे क्रेडिट कार्ड लाँच, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स

ओला क्रेडिट कार्ड

अ‍ॅप बेस्ड कॅब प्रोव्हायडर ओलाने आपल्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. ओलाने क्रेडिट कार्डसाठी एसबीआयबरोबर भागिदारी केली आहे. ओला क्रेडिट कार्डला Ola Money SBI Credit Card नावाने लाँच केले आहे. हे कार्ड व्हिसा कार्ड चालणाऱ्या सर्व आउटलेट्सवर चालेल. कार्डचे खास वैशिष्ट्य म्हणजे 'कॅशबॅक ऑफर'. आता हे कार्ड काही निवडक ग्राहकांना देण्यात येणार आहे. २०२० पर्यंत सुमारे १ कोटी ग्राहकांना क्रेडिट कार्ड वितरित करण्याचे लक्ष्य असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. 

ओला, उबर झाले जुने, नव्या कंपन्यांच्या प्रवेशाने ग्राहकांचा फायदा!

जिथे व्हिसा कार्ड स्वीकारले जाते. त्या व्यापाऱ्याकडे ओला मनी एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १ टक्का कॅशबॅक मिळेल. ही रक्कम तुमच्या ओला मनी वॉलेटमध्ये ३ दिवसांच्या आत क्रेडिट केली जाईल.

जर तुम्ही ओला कॅबसाठी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे दिले तर ७ टक्के कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकची मर्यादा प्रति महिना कमाल ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. 

क्लिअर ट्रिप ओला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हॉटेल बुकिंग केल्यास २० टक्के कॅशबॅक मिळेल. फ्लाइट बुकिंग केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. रेस्तराँमध्ये डाइनआउटच्या माध्यमातून बिल दिल्यास २० टक्के कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे पहिल्यावर्षी या कार्डला कोणतेही शूल्क नसेल. फ्यूल सरचार्जमध्येही सूट मिळेल.