पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओला, फ्लिपकार्ट कंपन्या क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याच्या तयारीत

ओला, फ्लिपकार्ट कंपन्या क्रेडिट कार्ड सेवाही देणार  Ola Company, Flipkart

ओला आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट या कंपन्या लवकरच आपले क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीच्या बँकांच्या साथीने या दोन कंपन्या क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देणार आहेत. ओला कंपनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तर फ्लिपकार्ट एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करुन ही सेवा देणार आहेत. या क्रेडिट कार्ड सुविधेवर ग्राहकांसाठी आकर्षक रिवॉर्डची योजना देखील कंपनीने आखली आहे. 

यापूर्वी अमेझॉन कंपनीने आयसीसी बँकेसोबत भागीदारी करत क्रेडिट कार्ड लॉन्च केले होते. यामध्ये अमेझॉनवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड प्वाइंट आणि सुट दिली जाते.  ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ओला आणि फ्लिपकार्ट कंपनी विशेष सुट आणि रिवॉर्ड प्वाइंट देईल, असे मानले जात आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट कार्ड सुविधेमुळे या कंपन्यांना ग्राहकांच्या खर्चाचा आवाका चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. ऑनलाईन कंपनी फ्लिपकार्ट कंपनी क्रेडिट कार्टच्या माध्यमातून ऑफलाइन खर्चाची माहिती गोळा करुन आपला व्यवसाय वाढवण्यास प्रयत्नशील असले. तर दुसरीकडे ओला कंपनीला आपला व्यवसायाचा विस्तार करणे सुलभ होईल. 

दोन्ही कंपन्या लॉन्चिंगनंतर पहिल्या वर्षासाठी जवळपास १० लाख ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देणार आहेत. सध्याच्या घडीला १५ कोटी लोक ओला कंपनीच्या कार सेवेचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्डच्या सुविधेमुळे ओलासह फ्लिपकार्टच्या व्यवसायात आणखी भर पडेल.