पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कासिम सोलेमानींच्या हत्येनंतर तेलाचे दर भडकले

पेट्रोल, डिझेल

अमेरिकेने बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे वरिष्ठ कमांडर कासिम सोलेमानी मारले गेले. या घटनेचे पडसाद अपेक्षेप्रमाणे तेल व्यापारावर उमटले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर एका दिवसात ४ टक्क्यांनी वधारले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दरही येत्या काळात वाढणार आहेत.

'काँग्रेसने आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर ट्विट करून आपणच कासिम सोलेमानी यांना मारण्याचे आदेश दिले होते, असे म्हटले आहे. या घटनेचे पडसाद पुढील काही दिवस आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावर उमटणार आहेत. त्याचबरोबर इराणमधील परिस्थितीमुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेही तेलाचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज विश्लेषकांनी वर्तविला आहे.

केवळ सत्तेसाठी सर्व संधीसाधू एकत्र - गडकरी

ब्रेंटवर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६९.१६ डॉलवर जाऊन पोहोचले. त्यामध्ये ४.४ टक्क्यांची वाढ झाली. तर दुसरीकडे डब्लूटीआयवर ही वाढ ४.३ टक्के होती. शुक्रवारी पहाटे घडलेल्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता गुंतवणूकदारांनी गृहीत धरली आहे. काही गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली आहे. अशा पद्धतीने कारवाई करणे म्हणजे केवळ आपल्या ताकदीचे चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन करण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.