पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेने हमसफर एक्स्प्रेससाठी केलेले पाच बदल माहिती करून घ्या...

हमसफर एक्स्प्रेस

तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या हमसफर एक्स्प्रेस संदर्भात भारतीय रेल्वेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हमसफर एक्स्प्रेस पुरता करण्यात आलेले हे बदल प्रवाशांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये डिसेंबर २०१६ मध्ये हमसफर एक्स्प्रेस या नव्या रुपातील रेल्वेसेवेची सुरुवात झाली होती. गोरखपूर ते आनंद विहार स्थानकांदरम्यान पहिली हमसफर एक्स्प्रेस धावली होती. हमसफर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. 

काय आहेत नवे बदल
१. हमसफर एक्स्प्रेसमध्ये आतापर्यंत एसी ३ या स्वरुपाचेच डबे होते. पण आता या गाडीमध्ये साध्या शयनयान श्रेणीतील डबेही असणार आहेत. आनंद विहार अलाहाबाद हमसफर एक्स्प्रेसला शयनयान श्रेणीचे चार डबे जोडण्यात आले आहेत.

२. यापुढे हमसफर एक्स्प्रेसमध्ये फक्त एकच भाडे पद्धती (फिक्स्ड फेअर) असणार आहे. सध्या या गाडीसाठी बदलणारी भाडे पद्धती (व्हेरिएबल फेअर सिस्टिम) अस्तित्त्वात होती.

... म्हणून गोळीबार थांबवून पाकिस्तानी सैनिकांनी दाखवला पांढरा झेंडा!

३. मेल आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यापेक्षा हमसफर एक्स्प्रेसचे भाडे १.१५ पटीने जास्त असणार आहे.

४. हमसफर एक्स्प्रेसमध्ये तात्काळ तिकिटाचे भाडे कशा पद्धतीने आकारले जाणार, याच्याही नियमात बदल करण्यात आले आहेत. हमसफर एक्स्प्रेस गाडीच्या मूळ भाड्याच्या (बेस फेअर) १.३ पट इतके हमसफर एक्स्प्रेसचे तात्काळ तिकिटेचे भाडे असणार आहे.

५. हमसफर एक्स्प्रेससाठी इतर सर्व आकार उदा. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट गाडी शुल्क, जीएसटी हे स्वतंत्रपणे आकारले जाणार आहे.

आमची फाईल कायम डस्टबीनमध्येच जायची, उदयनराजेंची टीका