पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

GDP घटण्याची चिंता नाही, प्रणव मुखर्जींचे महत्त्वपूर्ण विधान

प्रणव मुखर्जी

देशातील आर्थिक मंदी सदृश्य स्थितीची मला अजिबात चिंता वाटत नसल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. काही गोष्टी घडताहेत त्याचे परिणाम नक्कीच दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले. युपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्भांडवलीकरणामध्ये काही गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेच्या मान्यतेनंतर आता नागरिकत्व विधेयकापुढे हे आव्हान

भारतीय सांख्यिकी संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बीजभाषण करताना त्यांनी सांगितले की, एकूण देशांतर्गत उप्तादन (GDP) विकासदर घटल्याबद्दल मला चिंता वाटत नाही. काही गोष्टी घडताहेत त्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे. २००८ मधील जागतिक आर्थिक अडचणीच्या काळातही भारतातील बँकांनी व्यवस्थित तग धरला होता. 

ते म्हणाले, त्यावेळी मी देशाचा अर्थमंत्री होतो. पण देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एकाही बँकेने भांडवलासाठी माझ्याकडे मागणी केली नव्हती. पण आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज पडते आहे. अर्थात त्यामध्ये काही गैर नाही. 

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशामार्फत चौकशी होण्याची शक्यता

लोकशाही व्यवस्थेत संवाद अत्यंत आवश्यक असतो. संवादाच्या माध्यमातूनही कोणताही प्रश्न सोडविला जाऊ शकतो. त्यामुळे संवादाला कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.