पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनं विक्रीच्या वृत्तावर आरबीआयचे स्पष्टीकरण

आरबीआयने सोने विक्री संदर्भातील वृत्त फेटाळले आहे

रिझर्व्ह बँकेनं तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमातून झळकत होते. याची जोरदार चर्चा रंगत असताना आरबीआयने आपली बाजू मांडत हे वृत्त फेटाळून लावले. आरबीआयने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. 'आरबीआय सोन्याची विक्री अथवा व्यापार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलय. पण आरबीआयकडून सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार केला जात नाही,' असं आरबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

'आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलर सोनं खरेदी केले आहे, तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकेड ऑगस्टच्या अखेरपर्यंत १९.८७ दशलक्ष औंस कोटी सोनं होते. मात्र ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये केवळ २६.७ अब्ज डॉलर सोनं उपलब्ध आहे', या वृत्तामुळे चांगलीच खळबळ माजली होती. सोन्याच्या विक्रीतून निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत आरबीआय शेअर करण्याचा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला होता. पण, आरबीआयने हे वृत्त अफवा असल्याचे म्हटले आहे.