पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्फोसिसः वेतन वाढ नाही, कर्मचारी कपातही नाही, पुढील वर्षी ३५००० नवीन नोकऱ्या

कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसही दबावात आहे.

कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसही दबावात आहे. कंपनीने नवीन नियुक्त्या थांबवल्या असल्याचे कंपनीचे सीएफओ निलांजन राय यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पदोन्नती आणि वेतन वाढीही रोखण्यात आली आहे. परंतु, या काळात कोणाची नोकरी जाणार नसल्याची हमी कंपनीने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर कंपनी पुढील वर्षी नवीन ३५ हजार नोकऱ्या देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

'महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण करु नका'

ते पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीत रिटेल, ट्रॅव्हल, हॉस्पिटीलिटी, एनर्जी आणि ऑईल सेगमेंटवर सर्वाधिक परिणाम होईल. कार्ड्स आणि पेमेंट्स सेक्टरसाठीही हा संघर्षाचा काळ आहे. दरम्यान, कंपनी कोविड-१९ शी संबंधित कर्मचारी कपातीवर विचार करत नसल्याचे इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांनी म्हटले. 

रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राव म्हणाले की, टप्प्याटप्याने कंपनीचे कर्मचारी कामावर परततील. आम्ही कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये आणण्यासाठी घाई करणार नाही. पहिल्या टप्प्यात आम्ही केवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांना बोलावू आणि पुढील टप्प्यात सुमारे १५ टक्के कर्मचारी येतील. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३५ हजार नवे कर्मचारी घेतले जातील. 

राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसला मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्ष २०१९-२०च्या चौथ्या तिमाहीत नफा ६.३ टक्केंनी वाढून ४३३५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने मागील वर्षांत याच काळात ४०७८ कोटी रुपये लाभ झाला होता.