पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वास ठेवू नका, १००० रुपयांच्या नोटेचे व्हायरल झालेले फोटो खोटे

१००० रुपयांच्या नोटेचे व्हायरल झालेले फोटो

रिझर्व्ह बँकेकडून एक हजार रुपयांची नवी नोट चलनात आणण्यात आली असल्याचे संदेश सध्या सोशल मीडिया साईट्सवर फिरताहेत. या नव्या नोटेचे फोटोही व्हॉट्सऍप, फेसबुकवर व्हायरल होताहेत. पण अशी कोणतीही नवी नोट रिझर्व्ह बॅंक आणणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेली ती माहिती खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत पाठवले

या फोटोमध्येही अनेक त्रुटी आहेत हे फोटो नीटपणे बघितल्यावर ते स्पष्ट होते. या नोटेच्या उजव्या बाजूला वरच्या भागात artistic imagination असे लिहिण्यात आले आहे. यावरूनच हे स्पष्ट होते की केवळ कल्पनेत अशी नोट कशी असेल, याचे हे डिझाईन आहे. रिझर्व्ह बँकेकडून एक हजार रुपयांची नोट येणार असल्याची अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस

रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या कोणत्याही चलनी नोटेवर तत्कालिन गव्हर्नरची स्वाक्षरी असते. पण सध्या एक हजार रुपयांच्या नोटेचे जे फोटो फिरताहेत. त्यावर महात्मा गांधी यांची स्वाक्षरी आहे. यावरूनही ही खोटी माहिती असल्याचे स्पष्ट होते.