पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक मंदीमुळे मनुष्यबळात कपातीचा विचार नाही - टाटा मोटर्स

टाटा मोटर्स

देशात आर्थिक मंदीसदृश्य स्थिती असली तरी टाटा मोटर्स सध्या मनुष्यबळात कपात करण्याचा कोणताही विचार करीत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. येत्या काळात टाटा मोटर्स काही नव्या गाड्या घेऊन बाजारात येत आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. त्याचबरोबर देशातील स्थितीत बदल होईल, असेही कंपनीला वाटते आहे. त्यामुळेच तूर्त मनुष्यबळात कपात न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून आता हा उपाय...

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सकडे सध्या ८३००० कर्मचारी आहेत. कंपनीच्या व्यावसायिक आणि प्रवाशांसाठीच्या गाड्यांच्या निर्मितीसाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ग्वांटेर बुश्चेक यांनी पीटीआय सांगितले की, मनुष्यबळात कपात करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. जर कंपनीला असा काही निर्णय घ्यायचा असता तर तो आतापर्यंत घेतलाही गेला असता. गेल्या १२ महिन्यांपासून वाहन उद्योगासाठी परिस्थिती चिंताजक आहे. जर आम्हाला असा काही निर्णय घ्यायचा असता तर आतापर्यंत आम्ही तो घेतलाही असता, असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस

ते म्हणाले, येत्या काही महिन्यांमध्ये भारत स्टेज सहाची वाहने बाजारात येत आहेत. त्याचवेळी टाटा मोटर्सकडून अल्ट्रॉज, नेक्सन ईव्ही, ग्रॅव्हिटास एसयूव्ही या गाड्याही कंपनी लवकरच बाजारात आणणार आहे.