पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर बंदीचा विचार नाही - गडकरी

नितीन गडकरी

पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर थांबविण्यासाठी त्यावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा कसलाही विचार नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात गुरुवारी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाहन क्षेत्रामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून नितीन सरदेसाई यांची चौकशी

गडकरी म्हणाले, पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर सरकार बंदी घालणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मंत्रालयाकडेही या स्वरुपाच्या सूचना आल्या आहेत. पण आम्ही असा कोणताही निर्णय घेणार नाही. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही. त्याचवेळी द्विस्रोतांवर (हायब्रीड) चालणाऱ्या गाड्यांवरील जीएसटी कमी करण्याचाही सरकार विचार करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक अधिवेशनामध्ये नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. जागतिक व्यवस्थेतील कारणांमुळे सध्या भारतातील वाहन क्षेत्रात मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. पण सरकार तुमच्यासोबत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या नेतृत्त्वाखाली आपण या प्रश्नावर नक्की मार्ग काढू, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

'लिव इन रिलेशनशीपमध्ये महिलेला 'रखेल'सारखी वागणूक'

भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ३०.९८ टक्के इतकी घट झाली आहे. गेल्या १९ वर्षांमधील ही सर्वांत मोठी घट आहे.