पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीता अंबानी झाल्या जगातील सर्वांत मोठ्या कला संग्रहालयाच्या ट्रस्टी

नीता अंबानी आणि अनिल अंबानी (PTI File )

रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांची आज न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या विश्वस्तपदी निवड झाली. त्या संग्रहालयाच्या १५० वर्षांच्या इतिहासात विश्वस्त होणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. 

संग्रहालयाचे अध्यक्ष डॅनिएल ब्रॉडस्की यांनी नीता अंबानी यांच्या नावाची घोषणा केली. ते म्हणाले की, भारतीय कला आणि संस्कृतीचे रक्षण करणे आणि त्याला  प्रोत्साहन देण्यासाठी अंबानी यांची प्रतिबद्धता असाधारण आहे. त्यांना विश्वस्त मंडळात सहभागी केल्यामुळे संग्रहालयाच्या क्षमतेमध्ये वाढ होईल. नीता अंबानींचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. 

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

२०१७ मध्ये मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्टने एका खास कार्यक्रमात नीता अंबानी यांना सन्मानित केले होते. कला जगतात विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते.

अंबानी यांना २०१७ मध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या कामासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी प्रतिष्ठित राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केला होता. २०१६ मध्ये फोर्ब्सने अंबानी यांना आशियातील ५० सर्वांत शक्तीशाली व्यावसायिक महिलांच्या यादीत समावेश केला होता. त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यही आहेत आणि अशी भूमिका निभावणाऱ्या पहिल्या भारतीय महिलाही आहेत.

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर