पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सितारमण

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी संतप्त झालेल्या खातेधारकांनी गुरुवारी मुंबईतील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खातेधारकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

भाजप कार्यालयात निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'सरकारचा पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत बँकाचा व्यवहार येत नाही. तसंच गैरव्यवहार थांबवण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करु' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच आरबीआय याप्रकरणावर लक्ष ठेवून आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल

पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे सामान्य खातेधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आरबीआयने बँकेतील पैसे काढण्यावर देखील निर्बंध घातले आहेत. भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. खातेधारकांना होत असलेल्या समस्या त्यांनी सीतारामन यांना सांगितल्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी खातेधारकांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्यांच्या घरी, कॉलेजवर इन्कम टॅक्सचे छापे