पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीरव मोदीला झटका, ४ बँक खाती गोठवण्याचे आदेश

नीरव मोदी

कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची स्वीस बँकेतील चार खाती गोठविण्याचे आदेश तेथील सरकारने दिले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने ही बँक खाती गोठविण्याची मागणी तेथील सरकारकडे केली होती. या निर्णयामुळे नीरव मोदी याच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे. नीरव मोदी याला भारताकडे प्रत्यार्पित केले जावे, अशी मागणी इंग्लंडकडे करण्यात आली आहे. त्यावर येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय येणार आहे.

नीरव मोदीची स्वीस बँकेतील चार खाती गोठविण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २८६ कोटी रुपये जमा होते, अशी माहिती या निर्णयाशी संबंधित सूत्रांनी सक्तवसुली संचालनालयाला दिली. सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदी याची देशातील आणि परदेशातील मिळून २००० कोटी रुपयांच्या संपत्तीवर आधीच टाच आणली आहे.

प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेल्सचा सुळसुळाट, सावध राहण्याचे आवाहन

नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्यासाठी सक्तवसुली संचालनालय प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवून हे दोघेही परदेशात पळून गेले होते. तेव्हापासून सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय त्यांच्या मागावर आहेत.