पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे प्रवास करायचाय? कोणती गाडी निवडणार...सरकारी की खासगी!

रेल्वेगाडी

देशात खासगी कंपन्याकडून चालविण्यात येणाऱ्या रेल्वे लवकरच विविध मार्गावर दिसणार आहेत. त्यासाठीचा नियमांचा मसुदा सध्या निती आयोगाकडून अंतिम करण्यात आला आहे. यामध्ये खासगी रेल्वेगाड्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये खासगी रेल्वेगाड्यांना स्वतःचे कर्मचारी नेमता येतील. त्याचबरोबर या गाड्यांचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर इतका ठेवण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ज्या मार्गावर खासगी रेल्वेगाडी धावणार आहे. त्या मार्गावर १५ मिनिटांच्या काळात भारतीय रेल्वेला आपली गाडी सोडता येणार नाही, असे या मसुद्यात म्हटले आहे.

'काँग्रेस-NCPसोबत गेल्यामुळे हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दूर गेला'

निती आयोगाने या मसुद्यावर चर्चा घडवून यावी यासाठी त्याची एक प्रत आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. देशात वेगवेगळ्या १०० मार्गांवर १५० खासगी रेल्वेगाड्या धावणार आहेत. त्यासाठी २२५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

मसुद्यातील महत्त्वाच्या तरतुदी...
एकूण १०० मार्ग १० ते १२ विभागांमध्ये विभाजित करण्यात येणार आहेत.

खासगी कंपन्यांना बाजारभावाप्रमाणे तिकीट आकारणीचा अधिकार असेल. 

खासगी गाडी कुठल्या स्थानकावर थांबवायची याचा अधिकार त्याचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीकडे असेल

खासगी गाड्यांमध्ये श्रेणींची रचना कशी असेल हे सुद्धा ठरविण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल

भारतीय रेल्वेकडून खासगी गाड्यांना सापत्न भावाची वागणूक मिळणार नाही, याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे. 

खासगी गाडी धावणार असलेल्या मार्गावर १५ मिनिटांच्या अंतरात भारतीय रेल्वेला आपली गाडी सोडता येणार नाही.

सुरक्षा महत्त्वाची, एअर इंडियानं इराणमधील विमान प्रवासाचे मार्ग बदलले

प्रत्येक खासगी गाडीला कमाल १६ डबे असतील.

खासगी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभाल ही संबंधित कंपनीची जबाबदारी असेल.

रेल्वेकडून खासगी गाड्यांच्या देखभालीसाठी, स्वच्छतेसाठी जागा आणि वेळ निश्चित करून दिली जाईल. 

खासगी कंपन्यांना रेल्वे चालविण्यासाठी निश्चित शुल्क अगोदर भारतीय रेल्वेकडे जमा करावे लागतील.