पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक रुपयाच्या नव्या नोटेची ही वैशिष्ट्ये माहितीयेत का?

एक रुपयाची चलनी नोट

केंद्र सरकार लवकरच एक रुपयाच्या नव्या चलनी नोटा बाजारात आणणार आहे. या चलनी नोटा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून आणण्यात येणार आहेत. एक रुपया व्यतिरिक्त इतर सर्व किमतीच्या चलनी नोटांची छपाई करणे आणि त्या वितरित करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असते. केवळ एक रुपयाची चलनी नोट केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि वितरित केली जाते. या नव्या एक रुपयाच्या चलनी नोटेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे...

१. या नोटेवर इंग्रजीतील गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अक्षरांच्या वर भारत सरकार असे लिहिलेले असेल.

२. एक रुपयाच्या नव्या नोटेवर केंद्रीय अर्थ सचिव अंतनू चक्रवर्ती यांची हिंदी आणि इंग्रजीतील स्वाक्षरी असेल.

... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास

३. नव्या एक रुपयाच्या नाण्याचेच डिझाईन नव्या नोटेवर असेल. त्यावर सत्यमेव जयते असे लिहिलेले असेल आणि इंग्रजीतील L अक्षरानंतर क्रमांक असतील.

४. नोटेच्या उजव्या बाजूला खालच्या भागात काळ्या रंगामध्ये क्रमांक छापलेले असतील.

५. नोटेच्या क्रमांकाचे पहिले तीन आकडे किंवा शब्द यांचा आकार एकसारखाच असेल

६. नव्या नोटेच्या मागच्या बाजूला भारत सरकार असे लिहिलेले असेल.

७. नवी नोट आयताकृती असून, त्याचा आकार ९.७ X ६.३ सेंटिमीटर इतका असेल.

आयसीसीसमोर दोषी कोण ठरणार? बांगलादेशी की...

८. नव्या नोटेचा रंग पिंक-ग्रीन असा असेल.