पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुती सुझुकीची नवी अल्टो लाँच, किंमत ३.८० लाख

मारुती अल्टो

देशातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली छोटी कार अल्टोची सुधारित आवृत्ती बाजारात आणली आहे. त्याची शोरुम किंमत ३.८० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मारुती सुझुकीच्या या नव्या आवृत्तीत अ‍ॅरो एज डिझाईन, आकर्षक अंतर्गत सजावट, उच्च इंधन कार्यक्षमता आणि नवीन सुरक्षा उपकरणांसह ही कार बाजारात आणली आहे.

भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला

मुंबई शेअर बाजाराला पाठवण्यात आलेला निवेदनात कंपनीने म्हटले की, मारुती सुझुकी इंडिया लि. आज आपल्या नव्या अल्टो व्हीएक्सआय-प्लस सादर करण्याची घोषणा करत आहे. नव्या आवृत्तीत स्मार्ट प्ले स्टुडिओही आहे. यामध्ये १७.८ सेंटिमीटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम्स लावण्यात आली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टिममध्ये अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्लेची सुविधा देण्यात आली आहे.

ही कार भारतातील सहा मानकांनुसार भारतात सादर करण्यात येणार आहे. याचे इंजिन नया मानकांनुसार आहे. ही कार २२.०५ किमी प्रती लिटर मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

दिल्ली आंदोलन: १८ मेट्रो स्टेशन बंद; ५ तासांनंतर मोबाईल सेवा सुरु

मारुती अल्टोमध्ये बीएस६-कम्प्लायंट ७९६ सीसी, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ६००० आरपीएम वर ४७ बीएचपीची पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ६९ टॉर्क जनरेट करते. इंजिन ५ स्पीड मॅन्युएल गिअरबॉक्स आहे.

नवीन अल्टोमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी चांगली करण्यात आली आहे. पुढच्या दोन्ही सीट्सला एअरबॅग आहेत. कार मागे घेण्यासाठी पार्किंग सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे. कारने मर्यादेपेक्षा जास्त वेग घेतल्यानंतर इशारा देणे आणि चालक आणि बाजूच्या आसनावरील व्यक्तीने सीट बेल्टचा वापर केला नसेल तर माहिती देण्याची प्रणाली यामध्ये पुरवण्यात आली आहे.

प्लीज, सनाला यापासून दूर ठेवा; सौरव गांगुलींची विनंती