पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NEFT सुविधा १६ डिसेंबरपासून २४ तास सुरू

स्टेट बँक ऑफ इंडिया

ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्यासाठी वापरण्यात येणारी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (एनईएफटी) सुविधा येत्या १६ डिसेंबरपासून २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी याची घोषणा केली. त्यामुळे १६ डिसेंबरपासून ग्राहक कोणत्याही वेळी एनईएफटीच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकणार आहेत.

हैदराबाद एन्काऊंटरवर राज ठाकरे म्हणाले की,...

एनईएफटीच्या माध्यमातून सध्या सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेतच पैसे पाठविता येत होते. त्याचबरोबर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी ही सुविधा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेतच उपलब्ध होती. इतर वेळी ग्राहकांना पैसे पाठविता येत नव्हते. जरी पैसे पाठविले तरी ते दुसऱ्या दिवशी जेव्हा कामकाज सुरू होईल. त्यावेळीच समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ते जमा होत होते. एनईएफटीची सुविधा २४ तास सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

सर्व बँकांना एनईएफटीच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरळीत होण्यासाठी चालू खात्यात पर्याप्त पैसे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर २४ तास एनईएफटी सुरू झाल्यानंतर ही सुविधा कायम सुरळीत राहावी, यासाठी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत.

उन्नावमध्ये जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेचा उपचारांवेळी मृत्यू

एनईएफटी आणि आरटीजीएस या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आधीच घेतला आहे. आता एनईएफटी सुविधा २४ तास सुरू करण्यात आल्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळाला आहे.