पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालबागचा राजाच्या दागिन्यांचा लिलाव; मंडळाला मिळाले कोट्यवधी रुपये

लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव

मुंबईकरांचा लाडका बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाला गणोशोत्सव काळामध्ये गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात सोने- चांदीचे दागिने दान केले होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजता लालबागचा राजाच्या मुख्य मंडपामध्ये या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. या लिलावा दरम्यान बाप्पाचे दागिने खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

राजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा ४ किलो २८६ ग्रॅम सोने, ८० किलो ३०० ग्रॅम चांदी आणि ६ कोटी ५ लाख रुपये दान स्वरुपात जमा झाले आहे. बाप्पाला दान केलेल्या दागिन्याच्या लिलावामध्ये गदा, हार, बाप्पाच्या मूर्ती, मोदक आणि साखळी या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. तसंच ताट, वाटी, चमचा, सोन्याचे कोटिंग केलेले चांदीचे पाय यांसह इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. ही सोन्या चांदीची दागिने लिलावासाठी ठेवण्यात आली होती. 

भारत-पाकमधील तणाव कमी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटणार:

लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली चांदीची मूर्ती २१ हजार रुपयांना विकली गेली. राज्याच्या चरणी वाहिलेले एक किलोचे सोन्याचे ताट, चमचा आणि वाटी यांची ४२ लाख ६० हजार रुपयांना विक्री करण्यात आली. एक किलो सोन्याची कॅडबरी ३९ लाख रुपयांना विकली गेली. दरम्यान, यंदा लालबागच्या राजाच्या चरणी वाहिलेल्या १०३ वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून १ कोटी २५ लाख ४१ हजार रुपये जमा झाले. मात्र यंदाच्या वर्षी मंदीमुळे लिलावाला फटका बसला असल्याचे चित्र समोर आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये साजरा करणार जन्मदिवस