पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधात उद्योगपती मुकेश अंबानी-नीता अंबानींची मोदींना साथ

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी

कोरोना विषाणूविरोधातील युद्धात रविवारी संपूर्ण देशाने एकजुटता दाखवली. देशातील सर्वसामान्य नागरिकांनी ९ वाजता घरातील वीज बंद केली आणि दिप प्रज्वलन केले, मेणबत्ती पेटवून घराच्या बाहेर ९ मिनिटे उभे राहिले. देशातील सर्वांत महागड्या घरातही हेच चित्र दिसले. होय, देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानीही रविवारी हेच चित्र दिसले.

पंतप्रधान मोदींचे आवाहन, देशवासियांचा पाठिंबा

रिलायन्स इंडस्ट्रिज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांच्याबरोबर निवासस्थानाच्या बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती पेटवली आणि दिवा प्रज्वलित करुन पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आपणही कोरोनाविरोधातील लढाईत पंतप्रधानांच्या बरोबर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यादरम्यान अँटिलिया या निवासस्थानाची वीज बंद केली होती. केवळ दिवे प्रज्वलित केले होते. 

९ वाजून, ९ मिनिट; पंतप्रधान मोदींनीही प्रज्वलित केले दिवे

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला सेलिब्रेटिंसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनीही साथ दिली. अभिनेत्री माधुरी दिक्षीत, रविना टंडन, अक्षय कुमार, दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, अर्जुन रामपाल, क्रिती सेनन आदींनी दीप प्रज्वलन केलेले आपले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.