पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मूडीजकडून पुन्हा धक्का, विकासदर आणखी घटण्याचा अंदाज

मूडीज

काही दिवसांपूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचे पतमानांकन 'स्थिर'वरून 'नकारात्मक' केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पंतमानांकन संस्था मूडीजने आता भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ५.६ टक्के इतकाच राहिल, असे म्हटले आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये वर्तविलेल्या अंदाजात विकासदर ५.८ टक्के राहिल, असा म्हटले होते. पण देशाच्या चहूबाजूंनी ग्राहकांकडून वस्तू व सेवांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यावर उपाय शोधण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता याचा विकासदरावरही परिणाम होणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'

भारतासाठी आर्थिक अंदाजांमध्ये आम्ही बदल करीत आहोत. २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये विकासदर ५.६ टक्के इतकाच राहिल, असा आमचा अंदाज आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वाढीला आलेली मंदगती अपेक्षेपेक्षा जास्त काळ कायम राहिल, असे आम्हाला वाटते, असे मूडीजने म्हटले आहे. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्तविलेल्या अंदाजामध्ये मूडीजने चालू आर्थिक वर्षासाठीचा विकासदर अंदाज ६.२ टक्क्यांवरून ५.८ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

अर्थव्यवस्था वाढीला पुन्हा गती प्राप्त व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टप्याटप्याने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये कंपनी कर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत खाली आणणे, परदेशातील गुंतवणूक वाढावी, यासाठीही काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील नव्या कंपन्यासाठी १५ टक्के इतकाच कंपनी कर ठेवण्यात आला आहे. या बदलांमुळे भारतातील कंपनी कर आता आशियातील इतर देशांइतकाच झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलिनीकरण करून चारच बँका करण्यात आल्या. स्टार्टअप कंपन्यांना विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांवरील खर्चातही वाढ करण्यात आली आहे. पण या सर्व निर्णयानंतरही ग्राहकांकडून मागणी वाढण्याला फारसा फायदा झालेला नाही.