पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा अंदाज (प्रातिनिधिक छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या फैलावाचा परिणाम जागतिक आर्थिक विकासदरावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याचे मूडीज गुंतवणूक सेवा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. २०२० मध्ये भारताचा विकासदर ५.४ टक्केच राहिल, असे मूडीजने म्हटले आहे. याच कंपनीकडून आधी हा अंदाज ६.६ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.

लष्करात महिलांना पर्मनंट कमिशन द्या,सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

चीनमध्ये जानेवारीपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. आतापर्यंत १७०० हून अधिक लोकांचा यामध्ये बळी गेला असून, हजारो लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनामुळे वुहानमध्ये गेल्या काही दिवसांपासून जनजीवन पूर्णपणे ठप्प आहे. आशियाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. 

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याची चिन्हे आहेत. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा त्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आम्ही विकासदराचा नवा अंदाज जाहीर करीत आहोत. २०२० मध्ये विकासदर ५.४ टक्के तर २०२१ मध्ये ५.८ टक्के इतका राहिल. याआधी कंपनीने हा अंदाज अनुक्रमे ६.६ आणि ६.७ टक्के इतका जाहीर केला होता.

नटवरसिंहही म्हणाले, नेहरुंना सरदार पटेल पहिल्या कॅबिनेटमध्ये नको होते

मूडीजकडून जागितक आर्थिक विकासदराच्या अंदाजातही घट करण्यात आली आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर आर्थिक विकासदरावर परिणाम होणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.