पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Stock Market: आर्थिक आकड्यांवर ठरेल शेअर बाजाराच गणित

शेअर बाजार

परदेशातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मागील आठवड्यात स्थानिक शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर मार्केटमधील सेन्सेक्स ५६४.५६ अंशांनी म्हणजेच १.४० टक्क्यांच्या वृद्धीसह ४१ हजार ९.७१ वर पोहचला. राष्ट्रीय निफ्टी देखील १.३९ च्या वृद्धीसह १२ हजार ८६ अंशांवर बंद झाला. 

ग्राहकाला BMW कार बदलून देण्याचे राष्ट्रीय ग्राहक हक्क आयोगाचे आदेश

मध्यम कंपनीच्या शेअरमध्ये १.११ टक्के इतकी वाढ ढाली तर छोट्या कंपन्यांच्या शअरमध्ये ०.०५ टक्के घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुढील आठवड्यात महागाई, औद्योगिक उत्पादन आणि आयात-निर्यातीच्या आकडेवारीवर याचा परिणाम दिसू शकतो. 

अबब! नाताळनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५ लाख रुपयांचा बोनस

शुक्रवारीच्या आकडेवारीनुसार, महागाई तीन वर्षांतील सर्वाधिक स्तरावर पोहचली आहे. तर ऑक्टोबरमध्ये औद्योगिक क्षेत्रात घसरण झाली आहे. सोमवारी महागाईचे आकडेवारी समोर येणार आहे. आयात-निर्यातीचे आकडे देखील पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. याचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळू शकतो.