पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल

लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन खरेदी शक्य होणार

देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या निर्णयानंतर केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर उत्पादन, जीवनाश्यक वस्तू आणि पॅकेजिंग यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्या यांचेही काम आवश्यकतेप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

'लॉकडाऊन हे काही कोरोनावर उत्तर नाही, तो केवळ तात्पुरता पर्याय'

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातील नव्या नियमावलीनुसार, मोबाइल फोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन सेटच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. २० एप्रिलपासून  ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि  अ‍ॅमेझॉन या कंपन्या आपले काम सुरु करुन या वस्तूंची विक्री करु शकतात, अशी माहिती गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोरोनाः १९३० च्या दशकातील आर्थिक मंदीनंतरचे सर्वांत मोठे संकट

देशातल कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत लॉकडाउनसंदर्भात मत जाणून घेतले होते. त्यानंतर मंगळवारी मोदींनी देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ दिवसांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आल्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात काही उद्योग-व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आण्याच्या दिशेने ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रासह ई-कॉमर्स क्षेत्रातील कामाला परवानगी दिली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Mobiles TVs refrigerators to be available on e commerce platforms from April 20 during lockdown