पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१ डिसेंबरपासून मोबाइल इंटरनेट सेवा महागणार

इंटरनेसेवा महागणार

एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल कंपन्यांनी  मोबाइल डेटाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मोबाइल इंटरनेट सेवा वापण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरण्यात येत असून या दरवाढीचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार आहे.

JIOच्या ग्राहकांना बसणार झटका, मोबाइल सेवा महागणार

चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा पुरवण्यात येते. भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी असून दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे इंटरनेट सेवा महागणार आहे.

मध्यमवर्गीयांना लवकरच सरकारकडून 'गिफ्ट', कोट्यवधी लोकांचा फायदा

नवीन दर किती असणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. कंपन्या एकाचवेळी १५ ते २० टक्के दर वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जून २०१६ पासून ते डिसेंबर २०१७ दरम्यान देशात मोबाइल डाटाच्या दरात ९५ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. आता मोबाइल डाटा ११.७८ रुपये प्रती जीबीच्या दराने उपलब्ध आहे. मोबाइल कॉलचे दरही ६० टक्क्यांनी कमी होऊन सुमारे १९ पैसे प्रती मिनिट झाले आहेत.