केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मोबाइल फोन, रेफ्रिजरेटर आणि रेडिमेड कपड्यांच्या विक्रीला परवानगी दिली होती. परंतु, आता ही सूट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केवळ जीवनावश्यक वस्तूच मिळतील. राष्ट्रव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत चालणार आहे.
देशात आतापर्यंत २२३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले: आरोग्य मंत्रालय
यापूर्वीच्या आदेशात म्हटले होते की, ई-कॉमर्स कंपन्या २० एप्रिलपासून या वस्तूंची विक्री करु शकतील. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. यात बिगर जीवनावश्यक उत्पादनांची विक्री केली जाऊ नये असे म्हटले आहे.
ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना सशर्त परवानगीः उद्धव ठाकरे
यापूर्वी देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी चर्चा सुरु होती. सध्या किराणा आणि औषधांची दुकाने सुरु आहेत. तर दुसरीकडे काही आवश्यक साहित्यांची होम डिलेव्हरीही केली जात आहे.
#IndiaFightsCorona
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) April 19, 2020
Supply of non-essential goods by e-commerce companies to remain prohibited during #Lockdown2 to fight #COVID19. pic.twitter.com/6Jdvuzw6VJ
जावेद अख्तरांनी कोरोना योद्धांवर हल्ला करणाऱ्यांना सुनावले खडेबोल