पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात

मारुतीच्या गाड्या महागल्या

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून आपल्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे मारूतीच्या वेगवेगळ्या श्रेणीतील कारमध्ये वाढ करण्यात आली. सोमवारपासूनच नवे दर अंमलात आले आहेत. मारुतीकडून करण्यात आलेली वाढ जास्तीत जास्त ४.७ टक्क्यांपर्यत आहे. अर्थात कंपनीकडून कोणत्या कारच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली हे नेमकेपणाने स्पष्ट करण्यात आलेले नाही.

विवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या

मारुती सुझुकीच्या निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे मारुती सुझुकीच्या काही श्रेणीतील कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलनुसार वेगवेगळी आहे. सर्वाधिक वाढ ४.७ टक्के इतकी असून, २७ जानेवारीपासूनच नवे दर अंमलात आले आहेत.

१ एप्रिलपासून देशात भारत स्टेज ६ निकषांवर आधारित गाड्या बाजारात येणार आहेत. या गाड्या आल्यावर जुन्या गाड्यांची नोंदणी परिवहन विभागाकडून करण्यात येणार नाही. या पार्श्वभूमीवर नव्या निकषांवर आधारित गाड्यांचे उत्पादन करण्यासाठी खर्च वाढत असल्यामुळेच कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. 

‘सीएए’विरोधातील भूमिकेबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण

मारुतीकडून काही दिवसांपूर्वीच सिआझ या कारचे भारत स्टेज ६ मधील मॉडेल बाजारात आणण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्येच मारुतीकडून आपल्या कारच्या किंमतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.