पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सात वर्षांत पहिल्यांदाच मारुतीचा प्लांट २ दिवस बंद राहणार

सात वर्षांत पहिल्यांदाच मारुतीचा प्लांट २ दिवस बंद राहणार

ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीच्या वृत्तादरम्यान देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने मोठा निर्णय घेतला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार हरयाणातील दोन प्रकल्पातून (गुरुग्राम आणि मानेसर) ७ आणि ९ सप्टेंबरला कोणतेच उत्पादन होणार नाही. दोन्ही दिवशी कंपनीने 'नो प्रॉडक्शन डे' जाहीर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ नंतर पहिल्यांदाच असे केले जाणार आहे.

सात तारखेला शनिवार आहे आणि ९ ला सोमवार. रविवारी कंपनीमध्ये सहसा काम होत नसते. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुटी मिळेल. कंपनीकडून याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेला फटका : मनमोहन सिंग

ऑटो क्षेत्रातील मंदीपासून मारुती कंपनीही दूर राहिलेली नाही. यामुळे कंपनीने ऑगस्टमध्ये आपले उत्पादन ३३.९९ टक्क्यांनी घटवले होते. गेल्या ७ महिन्यांपासून कंपनीने आपले उत्पादन घटवलेले आहे. कंपनीने या ऑगस्टमध्ये १,११,३७० यूनीट तयार केले होते. तर याच महिन्यात मागील वर्षी १,६८.७२५ यूनीट केले होते. कंपनीच्या छोट्या कार आल्टो आणि वॅगन आरची विक्री या दरम्यान ७१.८ टक्क्यांनी घटली आहे.