पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुती सुझुकी ३० सप्टेंबरला करणार सर्वांत स्वस्त SUV, जाणून घ्या किंमत

मारुती सुझुकी ३० सप्टेंबरला करणार सर्वांत स्वस्त SUV

मारुती सुझुकीने नुकताच एस-प्रेसोच्या (S-Presso) लाँचिगची तारीख जाहीर केली होती. येत्या ३० सप्टेंबरला भारतीय बाजारात ही एसयूव्ही लाँच केली जाईल. कंपनीने कारच्या लाँचिग तारखेशिवाय इतर कोणतीच माहिती सांगितलेली नाही. परंतु, एस-प्रेसोचे वैशिष्ट्ये आणि व्हेरियंटशी निगडीत काही माहिती समोर आली आहे. 

AIRTEL 'या' प्लॅनबरोबर देत आहे २ जीबी डेटा आणि ४ लाखांचा विमा

cardekho.com च्या मते, एस-प्रेसो सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध होईल. त्यांची नावे क्रमशः 'एसटीडी', 'एल', 'एल ऑप्शनल' 'व्ही', 'व्ही ऑप्शनल' आणि 'व्ही+' असेल. एल आणि व्हीच्या ऑप्शनल व्हेरियंटमध्ये पॅसेंजर एअरबॅगचा पर्याय दिला जाईल. मारुतीच्या या आगामी कारच्या सुरुवातीच्या व्हेरियंटमध्ये १३ इंच आणि टॉप लाईन व्हेरियंटमध्ये १४ इंचाचे व्हील्स मिळतील. एस-प्रेसोमध्ये स्टील रिम असण्याचीही शक्यता आहे. अलॉय व्हील्स दिले जाण्याची शक्यता खूप कमी आहे.

इंजिन

मारुती एस-प्रेसोमध्ये १.० लीटर बीएस ६ पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन ६८ पीएसचे कमाल पॉवर आणि ९० एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. पॉवर ट्रान्समिशननुसार यामध्ये ५ स्पीड मॅन्यूएल आणि एएमटी या दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. दरम्यान, ऑटोमॅटिक-मॅन्यूएल ट्रान्समिशन (एएमटी)चा पर्याय केवळ व्ही, व्ही (ओ) आणि व्ही+ व्हेरियंटसह मिळेल. एस-प्रेसो सीएनजी पर्यायात उपलब्ध होईल किंवा नाही याची सध्या तरी माहिती समोर आलेली नाही. 

फायदेशीर सरकारी योजना, दर महिना मिळेल १० हजार रुपये पेन्शन

फीचर्स

सुरक्षेच्या दृष्टीने एस-प्रेसोच्या सर्व व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), फ्रंट सीटबेल्ट रिमांइडर आणि स्पीड अलर्ट सिस्टिमसारख्या फीचर्सचा समावेश असेल. त्याचबरोबर ऑपश्नल आणि टॉप व्हेरियंटमध्ये फ्रंट पॅसेंजर एअरबॅगचे फीचर मिळेल. त्याचबरोबर एस-प्रेसोमध्ये टोयोटा इटियॉसप्रमाणे डॅशबोर्डच्या मध्यभागी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. 

किंमत

मारुतीच्या या कारची किंमत ४ लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात या कारचा सामना रेनो क्विड आणि डॅटसन रेडी गो बरोबर असेल.