पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maruti Suzuki ने ४०,००० 'वॅगन आर' परत मागवल्या

वॅगन आर

देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एक लिटर पेट्रोल इंजिनच्या ४०,६१८ वॅगन आर कार परत मागवल्या आहेत. या कारच्या फ्यूएल हॉजमधील समस्येमुळे त्या परत मागवल्या आहेत. या कार १५ नोव्हेंबर २०१८ ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान उत्पादित करण्यात आल्या आहेत. १.२ लिटर पेट्रोल इजिनच्या वॅगन आरमध्ये अशा पद्धतीची कोणतीच समस्या नाही. 

मारुती सुझुकीने परत मागवलेल्या १ लिटर पेट्रोलच्या इंजिनच्या ४०,६१८ कारमधील फ्यूएल हॉजची तपासणी केली जाईल. समस्या जाणवल्यास सदोष पार्ट मोफत बदलला जाईल. त्यासाठी मारुती सुझुकीचे डिलर्स २४ ऑगस्टपासून परत मागवलेल्या वॅगन आरच्या खरेदीदारांशी संपर्क साधणे सुरु करतील.

पारले जी कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

त्याचबरोबर ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट marutisuzuki.com वर जाऊन आपल्या कारचा यात समावेश आहे की नाही हे तपासू शकतात. यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर 'Important Customer Info' सेक्शनवर क्लिक करावे. तिथे वॅगन आरच्या रिकॉलची सूचना दिली गेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक पेज उघडले जाईल आणि त्याखाली 'Click here' पर्याय मिळेल. तिथे क्लिक केल्यानंतर एक बॉक्स सुरु होईल. त्यामध्ये चेसिस क्रमांक टाकल्यानंतर त्याची माहिती मिळेल. 

मारुती वॅगन आरच्या १.० लिटर पेट्रोल इंजिन असलेल्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ४.३४ लाख रुपये आहे. हे इंजिन वॅगन आरच्या LXI आणि VXI वेरियंटमध्ये मिळते. ९९८ सीसीचे हे इंजिन ६७ एचबी पॉवर जनरेट करते. या इंजिनचे मायलेज २२.५ किमी प्रति लिटर आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल