पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हेंटिलेटर्सच्या उत्पादन वाढीसाठी मारुती सुझुकी करणार मदत

वैद्यकीय उपकरणे, पर्सनल प्रोटेक्शन सूट्स यांचे उत्पादन वाढविण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी काही रुग्णांसाठी वापरावे लागणारे व्हेटिलेटर्सच्या उत्पादनासाठी आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने पुढाकार घेतला आहे. यासाठी मारुती सुझुकीने आरोग्यविषयक उपकरणे तयार करणाऱ्या AgVa हेल्थकेअर या कंपनीशी करार केला आहे. मारुतीच्या सहकार्यामुळे ही कंपनी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करू शकते. कंपनीकडून शनिवारी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील, राहुल गांधींची टीका

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढाईमध्ये आपली कंपनी कशा पद्धतीने सरकारला मदत करू शकते, याची विचारणा केली होती. वैद्यकीय उपकरणे, पर्सनल प्रोटेक्शन सूट्स यांचे उत्पादन वाढविण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात मदत करण्याची तयारी मारुती सुझुकी कंपनीने दाखविली होती.

COVID-19 अंतर ठेवायच म्हणजे त्यांना समाजातून आऊट करायचय नाही: सचिन

कंपनीने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, AgVa हेल्थकेअरशी झालेल्या सामंजस्य करारानुसार आता मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करेल. महिन्याला दहा हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. AgVa हेल्थकेअर ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनासाठी अधिकृत कंपनी आहे.