पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुती सुझुकी आणि महिंद्रा एँड महिंद्रासाठी वर्षाचा शेवट गोड!

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ झाली.

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक फटका देशातील वाहन उद्योगाला बसला आहे. पण गेल्या वर्षाचा अखेरचा महिना अर्थात डिसेंबर २०१९ मारुती सुझुकी आणि महिंद्रा एँड महिंद्रासाठी उत्साहवर्धक ठरला. या दोन्ही कंपन्यांच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ झाली. त्याचवेळी यांच्या स्पर्धक कंपन्या ह्युंदाई आणि टोयोटा यांची नकारात्मक वाढ झाल्याचे दिसून आले.

आणि प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी पश्चिम बंगालचा प्रस्ताव वगळला

गेल्या वर्षात मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत मोठी घट झाली होती. या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये कंपनीच्या १,२४,३७५ गाड्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०१८ मध्ये कंपनीच्या १,२१,४७९ गाड्या विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे कंपनीच्या विक्रीमध्ये गेल्या महिन्यात २.४ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. 

मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नवीन वॅगन आर, स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बलेनो, डिझायर या गाड्यांची विक्री डिसेंबर ६५६७३ इतकी झाली. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१८ मध्ये ती ५१३४६ इतकीच होती. त्यामुळे या श्रेणीतील गाड्यांच्या विक्रीतील वाढ २७.९ टक्के इतकी होती.

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं: एकनाथ खडसे

महिंद्रा एँड महिंद्राच्या गाड्यांच्या विक्रीमध्येही डिसेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले. कंपनीच्या डिसेंबर २०१९ मध्ये ३७०८१ गाड्या विकल्या गेल्या. त्याचवेळी डिसेंबर २०१८ मध्ये कंपनीच्या ३६६९० गाड्या विकल्या गेल्या होत्या. कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये या काळात एक टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

चालू वर्षामध्ये लवकरच सर्व कंपन्यांकडून भारत स्टेज ६ (बीएस६) गाड्या आणल्या जाणार आहेत. या परिवर्तनासाठी आम्ही सज्ज आहोत. बीएस ६ गाड्या बाजारात आणण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे महिंद्रा एँड महिंद्राचे विक्री विभागाचे प्रमुख विजय राम नक्रा यांनी सांगितले.