पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुतीची एस-प्रेसो कार लाँच; ४ लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

मारुती सुझुकी ३० सप्टेंबरला करणार सर्वांत स्वस्त SUV

मारुती सुझुकीची एस-प्रेसो कार (S-Presso) सोमवारी भारतामध्ये लाँच झाली आहे. मारुती कंपनीची ही सर्वात स्वस्त एसयूव्ही कार असल्याचे सांगितले जात आहे. एस-प्रेसो कारची किंमत ३.३९ लाखांपासून सुरु होणार आहे. ही कार फक्त पेट्रोल इंजिनवर आहे. ही कार काहीशी एसयूव्ही सारखीच दिसते. मारुतीच्या या नव्या एस-प्रेसो कारची स्पर्धा रेनॉ क्विड या कारशी होणार आहे. 

मनसे निवडणुकीच्या रिंगणात; ५ ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा

मारुती एस-प्रेसो कार ४ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड, एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय प्लस याचा समावेश आहे. एस-प्रेसो या कारमध्ये १० पेक्षा अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार वजनाने देखील हलकी असल्याचे सांगितले जात आहे. 

नमिता मुंदडांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

मारुती एस-प्रेसोमध्ये १.० लीटरचे सिलेंडर बीएस ६ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६८ एचपी इतकी शक्तिशाली असून ते ९० एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार रेनो क्विडपेक्षा जास्त उंचीची आहे. तर लांबी, रुंदीच्याबाबतील ती रेनो क्विडपेक्षा छोटी आहे. 

देवीची रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीनं घेतली कित्येक दिवसांची मेहनत

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस-प्रेसो कारमध्ये एबीएस, स्पीड वॉर्निंग सिस्टम, ईबीडी, रियर पार्किंग सेंसर्स, हाय स्पीड अलर्ट, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेंशनरआणि लोड लिमीटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मारुती एस-प्रेसो कार समोरून अतिशय बोल्ड दिसते. 

शेतकऱ्यांनी लासलगावला कांदा लिलाव बंद पाडला, आग्रा मार्गावर आंदोलन