पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सात महिन्यानंतर मारुतीच्या विक्रीत सुधारणा, स्विफ्ट-बलेनोला मागणी

मारुती सुझुकी

देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या एकूण विक्रीत ऑक्टोबरमध्ये ४.५ टक्के वाढून १,५३,४३५ इतकी झाली आहे. कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली. गतवर्षी याच महिन्यात कंपनीने १,४६,७६६ वाहनांची विक्री केली होती.

मारुती सुझुकीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारातही याची विक्री ४.५ टक्क्यांनी वाढून १,४४,२७७ इतकी राहिली. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा आकडा १,३८,१०० इतका होता.

आल्टो, वॅगन आर आणि एस-प्रेसोसह कंपनीच्या मिनी कारची विक्री या दरम्यान १३.१ टक्क्यांनी घटून २८,५३७ इतकी झाली. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा आकडा ३२,८३५ वाहन होता.

बँकांच्या वेळांमध्ये आजपासून बदल, माहिती घेऊनच बँकेत जा

याचपद्धतीने स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरसह कॉम्पॅक्ट वाहनांच्या विक्रीत १५.९ टक्क्यांनी वाढून ७५,०९४ वाहनांची विक्री झाली आहे. जी ऑक्टोबर २०१८ मध्ये ६४,७८९ इतकी होती.

कंपनीच्या मध्यम आकाराची सेदान कार सियाजची विक्री ३९.१ टक्के घटून २,३७१ इतकी झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात ३,८९२ सियाज कार विकण्यात आले होते.

युटिलुटी वाहनांमध्ये व्हिटारा ब्रिझा, एस क्रॉस आणि आर्टिगाची विक्री वाढून २३,१०८ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २०,७६४ वाहनांची विक्री झाली होती. कंपनीची निर्यात ५.७ टक्क्यांनी वाढून ९,१५८ इतकी झाली. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबरमध्ये ८,६६६ वाहने निर्यात केली होती.

कॉग्निझंटमधून लवकरच १३००० कर्मचाऱ्यांची कपात