कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी इंडियाने ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी आणि सर्व्हिस कालावधी वाढवला आहे. मारुतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या वाहनांची मोफत सर्व्हिस, वॉरंटी आणि विस्तारित वॉरंटी १५ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२० या कालावधीत संपत असेल त्यांचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे.
लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय
यापूर्वी इंडिया यामाहा मोटर्सने रविवारी लाइफटाइम क्वॉलिटी केअर अप्रॉच अंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी अतिरिक्त ६० दिवस वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, कोविड-१९ अंतर्गत सध्याच्या लॉकडाऊनमुळे काही ग्राहकांना वेळवर आपल्या वाहनाची सर्व्हिसिंग करणे किंवा वॉरंटीचे फायदे घेण्यात अडचणी येत असतील. त्यामुळे १५ एप्रिल २०२० दरम्यान संपत असलेल्या सर्व्हिस आणि साधारण वॉरंटीचा लाभ जून २०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे.
लॉकडाऊनः व्होडाफोनकडून ग्राहकांना फ्री टॉकटाइम
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केंद्र सरकारने प्रवासी कामगारांकडून विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिला आणि सीमा पार केलेल्या लोकांना १४ दिवस वेगळे राहण्यास सांगितले.