पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मारुतीच्या विक्रीत ४७ टक्क्यांची घसरण, एमजी मोटर्सलाही फटका

मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांच्या विक्रीत मार्च २०२० मध्ये ४७ टक्क्यांची घट झाली आहे.

देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांच्या विक्रीत मार्च २०२० मध्ये ४७ टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीने बुधवारी याची माहिती दिली. मार्चमध्ये मारुतीच्या ८३७९२ वाहनांची विक्री झाली आहे. तर एमजी मोर्टर्सच्या १५१८ वाहनांची विक्री मार्चमध्ये झाली आहे. कंपनीने मागील वर्षी मार्चमध्ये १,५८०७६ वाहने विकली होती, असे मारुतीने एका निवेदनात म्हटले आहे. 

तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे, आरोग्यमंत्र्यांचे भावनिक पत्र

छोट्या कारच्या विक्रीत पाच टक्क्यांची घसरण
दरम्यान अल्टो आणि वॅगन आर सारख्या छोट्या कारची विक्री १५९९८ इतकी झाली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात १६८२६ इतकी होती. अशा पद्धतीने छोट्या कारची विक्री पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बलेनो आणि डिझायरसारख्या कॉम्पक्ट श्रेणीची विक्री ५०.९ टक्क्यांनी घटून ४०५१९ वाहनांची विक्री झाली आहे. अशाच पद्धतीने व्हिटार ब्रेझा, एस-क्रॉस आणि एर्टिगासह यूटिलिटी वाहनांची विक्री ५३.४ टक्क्यांनी घटून ११९०४ इतकी झाली. कंपनीने म्हटले की, या दरम्यान निर्यातही ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे. 

Coronavirus: अझीम प्रेमजींचा दानशूरपणा, ११२५ कोटींची केली मदत

एमजी मोटर इंडियाने बुधवारी सांगितले की, मार्च २०२० मध्ये १५१८ वाहनांची विक्री झाली. यामध्ये ११६ झेडएस ईव्ही आणि १४०२ हेक्टर एसयूव्हीचा समावेश आहे. 

एमजी हेक्टर आणि एमजी झेडएस ईव्ही या दोन्ही कारने भारतीय बाजारात आपली छाप सोडली आहे. जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत असूनही एमजी मोटर्स आपल्या ग्राहकांना सेवा देत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार

कोरोना विषाणूमुळे कंपनीचे प्लांट बंद

फेब्रुवारीमध्ये आमच्या विक्रीवर प्रभाव झाला होता. तर लॉकडाऊनच्या घोषणेपूर्वी मार्चमध्ये आमच्या स्थितीत सुधारणा झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे कंपनीचे प्लांट बंद झाले, असे एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चबा यांनी सांगितले. 

दरम्यान, कार उत्पादक कंपन्यांनी कर्मचारी कपात होणार नसल्याचा दिलासा कर्मचाऱ्यांना दिला आहे.