पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मारुती'च्या निवडक गाड्या स्वस्त, पाहा किंमती किती कमी झाल्या

मारुती सुझुकी

केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा आता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात काही कंपन्यांनी सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सुरुवातीच्या श्रेणीतील कारच्या किंमती पाच हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. कंपनी करामध्ये ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कारना बाजारात मागणीच नसल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर किंमत कमी करण्याचा कंपनीला फायदा होऊ शकतो. यामुळे ग्राहक कार खरेदी करण्याकडे वळू शकतात.

बॉलिवूडच्या 'सुलतान'ला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

आल्टो के १० आणि ८००, सेलेरिओ यासोबतच डिझेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा आणि एस क्रॉस या मॉडेलच्या किंमतींमध्ये पाच हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. संपूर्ण देशात आजपासून (२५ सप्टेंबर) नवे दर लागू होतील. कंपनीकडून सध्या सुरू असलेल्या विविध ऑफर्स व्यतिरिक्त ही नवी किंमत असणार आहे. किंमत कमी केल्यामुळे नवे ग्राहक चारचाकी गाडी घेण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीकडे येतील, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. 

काश्मिरच्या मुद्दयावर कोणीच साथ देत नसल्याने इम्रान खान निराश

येत्या काही दिवसांत सुरू होणारे नवरात्र, त्यानंतर येणार दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी नवे दर उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.