पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जून अखेरपर्यंत सरकारच्या डोईवर २.५४ लाख कोटींचं कर्ज

राजकोषीय तूट भरुन काढण्यासाठी सरकार नवी कर्जे उभारत असते.

चालू वर्षातील जूनपर्यंत सरकारच्या नावे २.५४ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. सरकारकडून बाजारातून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही अर्थसंकल्पातील तरतूदीच्या ५७ टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात कर्जासंदर्भात ४.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. महालेखा नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, गत वर्षी जूनपर्यंत सरकारने ३१ टक्के कर्ज घेतले होते.  

आता चर्चा फक्त POKवरच, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं

अर्थसंकल्पीय तूट व सरकारने उभारलेले कर्ज यांची बेरीज म्हणजे ‘राजकोषीय तूट’ होय. ही तूट बाजारातून नवी कर्जे काढून भरून दिली जाते. यावर्षीची राजकोषीय तूट ३.३ टक्के इतकी आहे. सरकारने २०१९-२० साठी बाजारातून ४.४८ लाख कोटी रुपये कर्ज उभारण्याची योजना आखली आहे. ही राशी मागील वर्षीपेक्षाही थोडी अधिक आहे. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात ४.४७ लाख कोटी निधी उभारण्यात आला होता.  

इन्कम टॅक्स रिटर्नमधील माहितीचे पुरावे सात वर्षे जपून ठेवा, कशासाठी माहितीये?