पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेला फटका : मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

सद्यस्थितीची आर्थिक आपत्ती ही मानव निर्मित असून नोटबंदी आणि जीएसटीमुळेच देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, असे मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकारने बदल्याचे राजकारण सोडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी योग्य व्यक्तींशी चर्चा करायला हवी, असा सल्लाही त्याने यावेळी दिला.

अर्थव्यवस्थेची स्थिती ही चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील तीन महिन्यापासून जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) वृद्धी दर ५ टक्क्यांवर स्थिर असून आर्थिक संकट दूरोगामी राहण्याचे संकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यामध्ये केलेली घाईमुळे मंदीचे संकट घोंगावत असल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मानव निर्मिती आर्थिक आपत्ती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कटू नितीचे राजकारण सोडून सरकारने योग्य व्यक्तींशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.   

जीडीपीची ५ टक्क्यांवर घसरण, मागील ६ वर्षांचा नीचांक

देशातील तरुण, शेतकरी, मजदूर, व्यापारी आणि वचिंत वर्गाला चांगल्या सुविधा मिळायला हव्यात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. उत्पादन क्षेत्रातील वृद्धी दर केवळ ०.६ टक्के आहे. ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. यावेळी त्यांनी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या १.७६ लाख कोटी रुपयांच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केले. एवढी मोठी रक्कम सरकारला दिल्यानंतर एखाद्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर होणार?, RBI सरकारला देणार १.७६ लाख कोटी

देशातील तरुणांना रोजगाराची आस दाखवणाऱ्या सरकारच्या काळात केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रात ३ लाख पेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. याला सरकारचे रणनिती कारणीभूत असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.