पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता मोबाईल चोरीला गेल्यास काळजी करू नका, सरकारचा नवा उपक्रम मदतीला

मोबाईल हँडसेट

मोबाईल हरविल्यावर प्रत्येकालाच खूप वाईट वाटते. आजच्या काळात मोबाईल गरजेची वस्तू झाली आहे. मोबाईलशिवाय अनेकांची नेहमीची कामे अडकून पडतात. पण आता मोबाईल हरविला किंवा चोरीला गेला, तर घाबरण्याचे कारण नाही. कारण तुमचा मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारचा नवा उपक्रम तुमच्या उपयोगाला येणार आहे.

भाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय म्हंटलय?

२०१७ पासून दूरसंचार विभागाकडून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर तयार करण्याचे काम केले जात आहे. यामध्ये देशातील मोबाईलचे आयएमईआय क्रमांक नोंदलेले असतील. भारताचा विचार केल्यास देशात अब्जापेक्षा जास्त मोबाईल कार्यरत आहेत.

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून या नव्या उपक्रमाचे उदघाटन केले जाणार आहे.

नक्की काम कसे करणार?
जर तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरविला तर तुम्हाला लगेच त्यांची पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी लागेल आणि त्याचवेळी दूरसंचार विभागाच्या हेल्पलाईनला त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. १४४२२ असा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे. यानंतर दूरसंचार विभागाकडून लगेचच संबंधित हँडसेट ब्लॉक केला जाईल. त्यामुळे त्या मोबाईल हँडसेटमध्ये कोणतेही नवे सीमकार्ड टाकून तो वापरता येणार नाही. यामुळे एक प्रकारे हा हँडसेट निरुपयोगी ठरणार आहे.

चिदंबरम यांना पुन्हा धक्का, दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळली

या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून बनावट मोबाईल हँडसेट शोधण्यासही मदत होणार आहे. याबद्दलची आणखी माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.