पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐतिहासिक उसळी ! सेन्सेक्सचे अब की बार ४० हजार पार

शेअर मार्केट

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला आघाडी मिळत असल्याचे दिसताच शेअर बाजारात उत्साह दिसून आला. सुरुवातीलाच बाजारात तेजी दिसून आली. प्रारंभी सेन्सेक्समध्ये ५३२ अंकाची उसळी दिसून आली. सेन्सेक्स ३९६४३ अंकावर गेला होता. दरम्यान, सेन्सेक्सने ४०००० हजारचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला. सध्या सेन्सेक्समध्ये ९०९ अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टीनेही आज १२००० हजारचा आकडा गाठला आहे. सध्या यामध्ये २७१ अंकांची वाढ दिसून आली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात दिसले होते. शेअर बाजाराने १० वर्षांतील विक्रमी उसळी घेतली होती. सोमवारी दिवसभरात सेन्सेक्स १४२१.९० अंकांनी वधारला तर निफ्टीतही तेजी पाहायला मिळाली होती.