पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एलआयसीमध्ये ८ हजार पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

एलआयसीमध्ये मेगा भरती

नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये (एलआयसी) ८ हजारांपेक्षा अधिक पदांसाठी भरती होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलआयसीमध्ये जवळपास साडेआठ हजार जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया होणार आहे. एलआयसीच्या देशभरातील विभागांमध्ये रिक्त असलेल्या सहाय्यक पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये लिपिक, सिंगल विंडो ऑपरेटर, रोखपाल, ग्राहक सेवा कार्यकारी या पदांचा समावेश आहे.

अयोध्या प्रकरण : युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत

एलआयसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध विभागात ही भरती प्रक्रिया होणार आहे. एलआयसी सहाय्यक भरती २०१९ नुसार ही भरती मध्य, पूर्व, पूर्व केंद्रीय, उत्तर, उत्तर केंद्रीय, दक्षिण, दक्षिण केंद्रीय आणि पश्चिम या विभागांमध्ये केली जाणार आहे. एलआयसीची ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.  

मध्य रेल्वेवर लवकरच स्वतःचे बॉम्ब शोधक पथक तैनात

एलआयसी सहाय्यक भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका बँक लिपिक आणि पीओ परीक्षेसारखीच असेल. एलआयसी सहाय्यक भरतीसाठी www.licindia.in/careers या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार आपला अर्ज भरु शकतील. अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. तर, अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर ऑनलाईन परिक्षा २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर मुख्य परिक्षेच्या तारखेची घोषणा नंतर केली जाणार आहे.  

'... म्हणून ब्राह्मण समाजाने भाजपविरोधात मतदान करावे'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lic assistant recruitment 2019 candidates can apply for more than 8000 assistant posts in lic